AurangabadCrimeUpdate : गुन्हेशाखेची धडाकेबाज कामगिरी, पाठलाग करुन मंगळसूत्र चोरटे जेरबंद

औरंगाबाद – जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने गुन्हे शाखेने अवघ्या ४५ मि.मंगळसूत्र चोरटे जेरबंद केले.हे दोन्ही रेकाॅर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्यावर परभणी जिल्ह्यात खुनाचे गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा शेषराव जाधव (२७),व राहूल शेषराव खरात (२३) दोघेही रा.परभणी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.३०वा. शैलजा विजय देवडीकर (६०) रा. लक्ष्मण विहार यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र वरील आरोपींनी जानकी हाॅटेलकडून विजयनगरकडे जाणार्या रोडवर वर हिसकावले. त्यामुळे देवडीकरांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्ष व पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फोन करुन घटनेची माहितीदिली. त्यामुळे चोरटे झाल्टा फाट्यावरुन जालनाकडे जात असल्याचे पोलिसांना समजले. कारण गुन्हेशाखेने वटपोर्णिमा सणानिमित्त चैनस्नॅचिंग होऊ नये म्हणून शहरात प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर पोलिस कर्मचारी मोटरसायकल सहित तैनात केले होते. या मधे सावंगी टोलनाका, वाळूज टोलनाका,संताजीचौकी, शहानूरमियाॅं दर्गा चौक, केंब्रीज चौक, महानूभव आश्रमचौक, दौलताबाद टी पाॅंईंट या ठिकाणांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसउपायुक्त दिपक गिर्हे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे,अविनाश आघाव यांनी भेट दिली.
केंब्रीज चौकात उभे असलेले गुन्हेशाखेचे कर्मचारी संजय नंद व काकासाहेब अधाने यांनी संशयितांना पाठलाग करुन जालना टोलनाक्या जवळ पकडून त्यांच्या कडून चोरीस गेलेले मंगळसूत्र मोटरसायकल, इत्यादी २ लाख ७०हजारांचा ऐवज जप्त केला. दरम्यान पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी जालना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनाही चोरटे जालना मार्गाने येत असल्याचे कळवले हौते.त्यामुळे जालना स्थानिक गुन्हेशाखेचे कर्मचारीही टोलनाक्याजवळ चोरट्यांना पकडण्याच्या तयारीत उभेहौते.
वरील कारवाई पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, एपीआय काशिनाथ महांडुळे, पीएसआय रावसाहेब जोंधळे, जालन्याचे पीऐसआय प्रमोद बोंडले यांनी पार पाडली.