UttarPradeshNewsUpdate : कानपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी यांनी घेतला मोठा निर्णय … बदल्या

नवी दिल्ली : कानपूर हिंसाचारानंतर यूपी सरकारने मोठे पाऊल उचलत कानपूरच्या डीएम नेहा शर्मा यांच्यासह 21 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कानपूरच्या डीएम पदाची जबाबदारी आता विशाख जी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त आणि कथित ‘अपमानास्पद’ वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळलाहोता . या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 30 हून अधिक जणांना अटक केली आहे.
विशेष म्हणजे कानपूर हिंसाचारावरून विरोधक योगी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. यासोबतच पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कानपूर डीएमवर बदलीचा कार्यभार निश्चित मानला जात होता.
दरम्यान भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा वाद अजूनही सुरूच आहे. इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, इराण, UAE, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशियासह किमान 15 देशांनी या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारताविरुद्ध अधिकृत निषेध नोंदवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे, तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.