IndiaWorldNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वादावरून भारताच्या विरोधात जमावबंदी, 15 देशांनी नोंदवला निषेध

नवी दिल्ली : भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रेषित मोहम्मद पैगंबर वाद अजूनही सुरूच आहे. विविध देशांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करताना भारत सरकारने सर्व धर्मांचा आदर असल्याचे म्हटले आहे. मात्र अनेक देशांची नाराजी अद्याप संपलेली नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांच्या यादीत सोमवारी आणखी काही देश सामील झाले असल्याचे वृत्त आहे.
आतापर्यंत इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, इराण, UAE, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशियासह किमान 15 देशांनी या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारताविरुद्ध अधिकृत निषेध नोंदवला आहे.
कोणत्या देशाने काय म्हटले ?
सौदी अरेबिया : सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भाजपच्या प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटले आहे की, त्यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने “इस्लाम धर्माच्या प्रतिकांच्या विरोधात पूर्वग्रहांना मान्यता दिल्याचा” पुनरुच्चार केला. “सर्व धार्मिक व्यक्ती आणि चिन्हांविरुद्ध पूर्वग्रहाला प्रोत्साहन देणारी कोणतीही गोष्ट नाकारली. पक्षाच्या प्रवक्त्याला निलंबित करण्याच्या भाजपच्या निर्णयाचे स्वागत करून मंत्रालयाने “श्रद्धा आणि धर्मांचा आदर” करण्याचे आवाहन केले.
मक्का -मदिना : एका वेगळ्या निवेदनात, मक्का येथील मस्जिद अल-हरम (काबा) आणि मदिना येथील पैगंबर मशीद (ए नबवी) च्या कामकाजाच्या ‘जनरल प्रेसीडेंसी’ने सोमवारी पैगंबर विरुद्ध भाजप प्रवक्त्याच्या “निंदनीय विधानांचा” निषेध केला.
इंडोनेशिया : सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियानेही या टिप्पणीचा तीव्र निषेध केला आणि दोन भारतीय राजकीय नेत्यांनी प्रेषिताविरुद्ध केलेली “अस्वीकारणीय अपमानास्पद टिप्पणी” असे म्हटले. इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, हा संदेश जकार्ता येथील भारतीय राजदूतांना पाठवण्यात आला आहे.
युएई : युएईनेही प्रेषिताचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आणि नाकारला. परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, UAE नैतिक आणि मानवी मूल्ये आणि तत्त्वांच्या विरोधात असलेल्या सर्व पद्धती आणि प्रथा नाकारतो.
जॉर्डन : जॉर्डनने देखील भाजप नेत्याच्या अपमानजनक वक्तव्याचा “तीव्र निषेध” केला, ज्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे.
ओआयसी : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ने या टिप्पण्यांचा निषेध केला आणि भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
अफगाणिस्तान : अफगाणिस्तान सरकारच्या तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे कि , “आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, अशा धर्मांधांना इस्लाम धर्माचा अपमान करु देऊ नका आणि मुस्लिमांच्या भावना भडकावू नका,” तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजैद यांनी हे निवेदन जरी केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 57 सदस्यीय ओआयसी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या मुद्द्यावर केलेली टीका स्पष्टपणे नाकारली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की भारत सर्व धर्मांना “सर्वोच्च आदर” देतो आणि गटाचे विधान “द्वेषाने प्रेरित, दिशाभूल करणारे आणि खोडकर” आहे असे वर्णन केले आहे.
दरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी वादग्रस्त कमेंटमुळे विविध देशांमध्ये सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. जेंव्हा कि , प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दिल्लीत भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. तर दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.