UPFireNewsUpdate : हापूर येथे एका रासायनिक कारखान्यात भीषण आग, १२ ठार , २० जखमी

हापूर : उत्तर प्रदेशातील हापूर येथे एका रासायनिक कारखान्यात स्टीम बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली असून त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ातील धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना शनिवारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की, आजूबाजूच्या अनेक कारखान्यांचे छत उडून गेले.
पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आणि अनेकांना तेथून बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूरच्या धौलाना पोलीस स्टेशन हद्दीतील यूपीएसआयडीसी (इंडस्ट्रियल एरिया) येथील सीएनजी पंपाच्या मागे असलेल्या कृष्णा ऑरगॅनिक कंपनीमध्ये शनिवारी बॉयलरचा स्फोट झाला, त्यामुळे तेथे आग लागली. मेरठ झोनचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.त्याचवेळी २० हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत.
हापूरच्या डीएम मेधा रुपम यांनी सांगितले की, अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. मेरठ झोनचे आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, मदतकार्य जलदगतीने करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य केले आणि जखमींना रुग्णालयात नेले. पोलिस व प्रशासनाच्या पथकानेही घटनास्थळी पोहोचून सहकार्य केले. हे प्रकरण धौलाना पोलिस स्टेशनच्या यूपीएसआयडीसीचे आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कारखान्याच्या आत एवढा जोरदार स्फोट झाला की, आजूबाजूच्या कारखान्यांचे छतही उडाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापूर जिल्ह्यात बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ९ मजुरांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बॉयलर स्फोट प्रकरणी तज्ज्ञांकडून चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.