Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध ईडीने पुन्हा आवळला फास …

Spread the love

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन दाखल झालेले माजी मंत्री  एकनाथ खडसे यांना ईडी ने नोटीस पाठवून  पुन्हा एकदा दणका दिला असून त्यांच्यासोबत इतर चार जणांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीकडून बजावण्यात आली आहे.


या विषयीची अधिक माहिती अशी कि , गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीकडून खडसेंची ५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यात जळगाव, लोणावळा येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंडाचा सामावेश होता. दरम्यान या कारवाईत लोणावळ्यातील बंगला आणि जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळे भूखंड ईडीने जप्त केले होते. आता  ही मालमत्ता १० दिवसांत  रिकामे करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. तसे नाही केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री, भाडेकरारावर किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येऊ नये, असे नोंदणी महानिरिक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि  एकनाथ खडसे त्यांच्याच सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी येथील ३.१ एकर एमआयडीसीचा फ्लॅट खरेदी केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच या फ्लॅटची किंमत ३१ कोटी रुपये असून हा फ्लॅट ३.७५ कोटी रुपयांमध्ये विक्री झाला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कमी बाजारभाव दाखवून हा व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे खडसे यापूर्वीही अनेक वेळा अडचणीत आले आहेत मात्र याबाबतची उत्तरे देऊनही ईडीने त्यांच्याविरुद्ध पुन्हा हि कारवाई केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!