Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

India News Update : सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मागेही ईडीची पिडा…..!!

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणीस क्तवसुली संचलनालयाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि  राहुल गांधी यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयानं २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा या प्रकरणात चौकशी सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


दरम्यान देशभर काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना ईडीने विविध आरोप प्रकरणात आपल्या जाळ्यात ओढले असून राजकारण करावे की, ईडीच्या चौकशीला सामोरे जावे असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.

Advertisements

असे आहे प्रकरण?

मीडियाच्या बातम्यांनुसार ‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!