IndiaPoliticalUpdate : काँग्रेसकडून राज्यसभेच्या १० उमेदवारांची नावे जाहीर , महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या 10 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना टाळून नवीन चेहऱ्यांना या यादीत काँग्रेस नेतृत्वाने संधी दिली आहे . या निर्णयाचे समर्थन करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसने दिलेल्या उमेदवरांचे स्वागत केले आहे. या यादीवरून कुठलाही रोष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे . दरम्यान काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मात्र आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राजस्थानातील नेत्यांनी आपला असंतोष केला जाहीर
विशेष म्हणजे राजस्थानच्या उमेदवारांच्या नावावर आणखी प्रश्न निर्माण केले गेले आहे. राजस्थानमधून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीत. यावर राजस्थानमधील सिरोही येथील काँग्रेसचे आमदार संयम लोढा यांनी प्रश्न उपस्थित केला असून, राजस्थानमधून कोणालाही उमेदवारी का दिली नाही, याचे स्पष्टीकरण पक्षाला द्यावे लागेल असे ट्विट केले आहे.
कांग्रेस पार्टी को यह बताना चाहिए कि राजस्थान के किसी भी कांग्रेस नेता/कार्यकर्ता को राज्यसभा चुनाव में प्रत्याशी नही बनाने के क्या कारण है ?#Rajasthan #Congress#RajyaSabhaElection2022#RajyaSabha@RahulGandhi@priyankagandhi @INCIndia @INCRajasthan pic.twitter.com/HHz9ZrowAA
— Sanyam Lodha (@SanyamLodha66) May 29, 2022
लोढा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले पाहिजे की, राजस्थानच्या कोणत्याही काँग्रेस नेत्याला/कार्यकर्त्याला राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार न करण्याचे कारण काय?’ यासोबतच त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही टॅग केले आहे.
‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) May 29, 2022
पवन खेर यांची नाराजी
इतकेच नाही तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्याकडूनही असंतोषाचा सूर उमटत आहे. मूळचे राजस्थानचे असलेले पवन खेडा हे काँग्रेसचे राज्यसभेचे दावेदार होते. मात्र त्यांचे नावही या यादीत नाही. यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव असेल’. मात्र, याशिवाय त्यांनी काहीही लिहिलेले नाही. पण ते राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीशी जोडले जात आहे.
कांग्रेस का चिंतन शिविर हुआ राजस्थान में, अब लीजिये इस चिंतन की एक और उपलब्धि…अब स्थानीय उम्मीदवारों का टोटा….बिना “लोकल” कौन होगा “वोकल”…#RajyaSabhaElections
— Satish Poonia (Modi Ka Parivar) (@DrSatishPoonia) May 29, 2022
दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचीही नावे या यादीत नाहीत. हे दोन्ही नेते ‘G-23’ गटात आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात बदलासाठी अनेकवेळा वकिली केली आहे. राजस्थान भाजपचे प्रमुख सतीश पुनिया यांनीही काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिविर झाले, आता या चिंतनाची आणखी एक कामगिरी घ्या. आता स्थानिक उमेदवारांचा कोटा…. ‘स्थानिक’ शिवाय ‘वोकल’ कोण असेल…’
राजस्थान व्यतिरिक्त राजीव शुक्ला आणि रणजीत रंजन हे दोन्ही बाहेरचे नेते छत्तीसगडमध्ये राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. दहा उमेदवारांपैकी पी चिदंबरम, जयराम रमेश आणि विवेक तन्खा या तीन उमेदवारांनाच आपापल्या राज्यातून तिकीट देण्यात आले. उर्वरित सात उमेदवार बाहेरचे आहेत. राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन्ही निवडणुकांची राज्ये आहेत आणि अशा परिस्थितीत काँग्रेसच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्रात कुठीली नाराजी नाही
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांमध्ये नाराजी नसल्याचा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे प्रत्येक पक्षाचे नेतृत्व राज्यसभेवर कुणाची नेमणूक करायची याचा याचा निर्णय घेत असते यात नवीन काहीही नाही. राज्यसभेवर निवडून दिले जाणारे उमेदवार हे स्थानिकच असले पाहिजेत असे काहीही नसते. जुन्या नेत्यांपेक्षा राज्यसभेत नवीन आणि तरुण नेत्यांना संधी देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रासाठी ज्यांची उमेदवारी दिली आहे त्यांचा अर्ज आम्ही दोन तारखेला भरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.