IndiaNewsUpdate : तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षांचे ओवेसी यांना द्वेषपूर्ण भाषणातून खुले आव्हान

करीमनगर : तेलंगणामध्ये “राम राज्य” स्थापन करण्याचा संकल्प करीत , भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी बुधवारी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना राज्यातील सर्व मशिदींचे उत्खनन करण्याचे आव्हान दिले. शिवलिंग सापडल्यास मुस्लिमांना मशिदी हिंदूंच्या ताब्यात द्याव्या लागतील, असे ते म्हणाले.
करीमनगरमध्ये बुधवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित हिंदू एकता यात्रेला संबोधित करताना बंदी संजय म्हणाले, “जिथे मशीद संकुलाचे उत्खनन होते, तेथे शिवलिंगे सापडतात. मी ओवेसींना आव्हान देतो की, राज्यातील सर्व मशिदी नष्ट करा. खोदून काढू. जर शिवलिंग (शिवलिंग) सापडले तर ते आमच्या स्वाधीन करा. तुम्ही हे आव्हान स्वीकाराल का? तेलंगणात रामराज्य आले तर आम्ही उर्दू भाषेवर पूर्णपणे बंदी घालू. अल्पसंख्याकांचे आरक्षण संपुष्टात येईल आणि उर्दू भाषेवर बंदी घालण्यात येईल . देशात जिथे जिथे बॉम्बस्फोट होतात, ते मदरशांमुळे होतात. त्यांना त्या ठिकाणी अतिरेकी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे उघकीस आणले पाहिजे असेही ते म्हणाले .”
Live: Hindu Ektha Yatra from Karinagar. https://t.co/wzh7uZRWGl
— Bandi Sanjay Kumar (Modi Ka Parivar) (@bandisanjay_bjp) May 25, 2022
आपल्या भाषणात संजय यांनी , दुष्ट शक्तींपासून राज्याला मुक्त करून भाजप रामराज्य स्थापनकरण्याचा संकल्प केला. “भाजप सत्तेवर आल्यास आम्ही सर्व मदरसे बंद करू, अल्पसंख्याकांना दिलेले आरक्षण काढून टाकू आणि एससी, एसटी, ओबीसी आणि ईबीसीसाठी अतिरिक्त कोटा देऊ. तसेच ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू भगिनींना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले कि , “आम्ही अशा घटकांना कोणत्याही किंमतीत खपवून घेणार नाही. त्यांच्या हड्ड्या तोडून मोडून त्यांना हिंदूंची ताकद दाखवून देऊ.”
गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद , श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद प्रकरणात न्यायालयात वाद -प्रतिवाद चालू आहेत. दरम्यान, साकेत न्यायालयाने कुतुबमिनार संकुलातील 27 हिंदू आणि जैन मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवरील आपला आदेश ९ जूनला आपला आदेश राखून ठेवला आहे. मंगळुरू आणि पुण्यासह देशाच्या इतर भागांमध्येही असे अनेक दावे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर बंदी संजय कुमार यांनी हे आव्हान केले आहे.