MaharshtraNewsUpdate : सध्याची प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, बुद्ध स्तूप आणि बुद्ध चैत्य, बौद्धांना हस्तांतरित करण्याची मागणी …

नागपूर : भारतातील मशिदीवर मंदिराचे दावे केले जात असताना , भारतातील जगन्नाथपुरी (ओरिसा), तिरुपती बालाजी( आंध्र प्रदेश), पंढरपूर, कांचीपुरम (तामिळनाडू), महाकाली( उज्जैन) इत्यादी असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे, बुद्ध स्तूप आणि बुद्ध चैत्य आहेत. ही सर्व मंदिरे पुरोहितांच्या आर्थिक उत्पन्नाचे फार मोठे स्त्रोत बनली आहेत. म्हणून ही सर्व मंदिरे पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे.
हा मुद्दा स्पष्ट करताना डॉ . आगलावे यांनी म्हटले आहे कि , संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ (१९२९) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, “ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या.”
आपल्या निवेदनात आगलावे यांनी पुढे म्हटले आहे कि , “कित्येक ठिकाणी तर अशा रीतीने बौद्ध विहारांचे रुपांतर शंकरांच्या देवळांत झाले. लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची. तेथे एक देवी प्रगट झाली. तिचे नाव एकविरा. ही म्हणे पांडवाची बहिण”.
“पंढरपूर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे सिद्ध करीन”
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे म्हटले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन.”