GujratNewsUpdate : भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू , कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाखांची मदत

अहमदाबाद : गुजरातच्या मोरबी येथील हलवड जीआयडीसी येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. दरम्यान बचाव पथके घटनास्थळी असून भिंतीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या समुद्री मीठ कारखान्यात ही दुःखद घटना घडली. “कारखान्यातील किमान १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत,” असे ते म्हणाले.
मृताच्या कुटुंबियांना ६ लाखांची मदत
दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी येथील मीठ कारखान्याची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोरबी येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये, पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०-५० हजार रुपये दिले जाणार आहेत.
Gujarat | At least 12 people died after a wall of a salt factory in Morbi's Halvad GIDC collapsed
12 people have died after an incident happened at Sagar Salt Factory in Halvad GIDC. Government stands with the families of the deceased: State Minister Brijesh Merja pic.twitter.com/lSBAaw2jJB
— ANI (@ANI) May 18, 2022