MaharashtraPoliticalUpdate : संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शरदा पवारांनी दिली प्रतिक्रिया

नांदेड : छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा घोषित केला आहे. राज्यसभेवरील त्यांचा उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे १०-१२ मते शिल्लक राहतात ती संभाजी राजे यांना देण्यात येतील असे पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज्यातून काँग्रेस -राष्ट्रवादी नाही शिवसेनेकडून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि छत्रपती संभाजीराजे यांनी कुठल्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अपक्षासहित सर्व पक्षीय अतिरिक्त आमदारांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांना आपला उमेदवारी अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
दरम्यान आपल्या नांदेड दौऱ्यात याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले, “राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद यावर अवलंबून आहे. आम्ही महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सिमीत मी सांगतो, राज्यसभेत आमचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे १०-१२ मते जादा शिल्लक राहतात.
“शिवसेनेकडे पण सरप्लस मतं, त्यांनाही अडचण नाही”
“शिवसेनेकडेही सरप्लस मते आहेत. त्यामुळे त्यांनाही काही अडचण नाही. राहता राहिला प्रश्न आमचा सहकारी पक्ष काँग्रेस तर त्यांच्याकडे देखील संख्याबळ आहे. कमी पडलं तर आम्ही मदत करू. आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. या व्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.