Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : भाजपने देशवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे : सोनिया गांधी

Spread the love

नवी दिल्ली: राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिविराच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.आणि भाजपने देशवासीयांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे, असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे कि, ‘नव संकल्प चिंतन शिबिर’ आम्हाला भाजप, आरएसएस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या धोरणांमुळे देशासमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करण्याची संधी देते.

यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी  नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला . पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ‘कमाल शासन आणि किमान सरकार’ म्हणजे काय हे आता वेदनादायकपणे स्पष्ट झाले आहे; याचा अर्थ अल्पसंख्याकांवर ‘पाशवी’ अत्याचार करणे.

प्रथम इंग्रजी आणि नंतर हिंदीत केलेल्या आपल्या भाषणात सोनिया गांधी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना म्हणाल्या कि , पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांनी चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. संघटनेत बदल ही काळाची गरज असून, आपल्या कामाची पद्धतही बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पक्षासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, “आम्ही मोठ्या आणि एकत्रित प्रयत्नांनीच बदल घडवून आणू शकतो, आपल्याला वैयक्तिक आकांक्षा संघटनेच्या गरजेनुसार ठेवाव्या लागतील. पक्षाने खूप काही दिले आहे आणि आता कर्ज फेडण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा हिंमत दाखवण्याची गरज आहे. प्रत्येक संस्थेला जगण्यासाठी बदल घडवून आणण्याची गरज आहे. सुधारणांची नितांत गरज आहे. ही सर्वात मूलभूत समस्या आहे.”

मी पक्षाच्या लोकांना विनंती करते की त्यांनी शिबिरात खुलेपणाने आपले मत मांडावे, मात्र त्यातून एक मजबूत पक्ष आणि पक्षातील एकतेचा संदेश देशात गेला पाहिजे असे आवाहनही सोनिया गांधी यांनी यावेळी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!