RanaNewsUpdate : टायमिंग चुकलं , राणा दाम्पत्याचा आजचा मुक्कामही तुरुंगातच … !!

मुंबई : बहुचर्चित खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला असला तरी न्यायालयीन आदेश तुरुंगाच्या नियमाप्रमाणे प्राप्त न झाल्यामुळे त्यांना आजचा मुक्काम तुरुंगातच करावा लागत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Mumbai | MP Navneet Rana & MLA Ravi Rana will not be released from jail today as their release orders couldn't be obtained from the concerned magistrate court in time. Their team will obtain release orders tomorrow morning from the court & then move to Byculla and Taloja Prisons.
— ANI (@ANI) May 4, 2022
कारागृहाच्या नियमाप्रमाणे कोणताही आदेश सायंकाळी 5.30 पर्यंत टपाल पेटित प्राप्त होणे आवश्यक आहे . मात्र असे न झाल्याने राणा दाम्पत्याचा एका रात्रीचा मुक्काम वाढला आहे. उद्या सकाळी कोर्टाकडून सुटकेचे आदेश मिळाल्यानंतर त्यांची सुटका होईल असे सांगण्यात येत आहे. गेल्या १२ दिवसांपासून राणा दाम्पत्य तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.
दरम्यान तुरुंगातील १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगांतून थेट जे . जे. रुग्णालयात नेण्यात आलं. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. रात्री त्यांना मान, पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.