AurangabadCrimeUpdate : शाब्बास ….याला पोलीस ऐसे नाव !! बाळाला सोडून पळालेल्या आईला तब्बल एक वर्षाने शोधले पण शोधलेच !!

औरंगाबाद : एका गर्भवती राहिलेल्या विवाहितेने चुकीचे नाव नोंदवून जन्म दिलेल्या अपत्याला सोडून पळ काढला. तब्बल एक वर्षांनी बेगमपुरा पोलिसांनी अपत्याच्या आईला शोधून बाळाला दता समिती समोर हवाली केले.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गेल्या ३०आॅगस्ट रोजी एका विवाहितेने घाटी रुग्णालयात एका पुरुष जातीच्या अपत्याला जन्म देत पळ काढला होता. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस त्या विवाहितेचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांनी त्या अपत्याचे नामकरण करुन त्याला महिला दक्षता समितीच्या सहकार्याने शिशूगृहात ठेवले होते. या घटनाक्रमाचे सी.सी. टि.व्ही. फुटेज पोलिसांनी तपासले असता. गर्भवती महिलेने खोटे नाव नोंदवून अपत्याला जन्म दिला होता.
पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांना खबर्याने सी.सी.फुटेज मधे दिसत असलेल्या महिलेचे खरे नाव कळवताच पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेत बाळ आणि संशयित महिलेचे डी.एन.ए. टेस्ट केले ते जुळल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार पीएसआय विशाल बोडखे यांनी महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष डाॅ.मनोहर बन्सवाल व इतर सदस्यांच्या मदतीने बाळाच्या आई व तिच्या पालकांचे समुपदेशन करंत बाळाला आईच्या हवाली केले. वरील कारवाईत पीएसआय विशाल बोडखे यांनी सुसुत्र पध्दतीने तपास पूर्ण केला.या कारवाईत पोलिस उपायुक्त उज्वला वानकर, एसीपी अशोक थोरात यांनी मार्गदर्शन केलेले आहे.