IndiaNewsUpdate : कोळसा टंचाईमुळे देशाच्या राजधानीवरही विजेचे मोठे संकट

नवी दिल्ली : कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईला देश सामोरे जात असून देशाच्या राजधानी दिल्लीवरही विजेचे संकट निर्माण झाले आहे . दिल्लीचे उर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीची बैठक घेतली आणि केंद्राला पत्र लिहून राष्ट्रीय राजधानीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. दरम्यान या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संभाव्य वीज टंचाईमुळे राजधानीतील मेट्रो ट्रेन आणि रुग्णालयांसह महत्त्वाच्या आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा खंडित होण्याबाबत एक मोठा इशारा दिला आहे.
दिल्ली सरकारने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “दोन पॉवर स्टेशनमध्ये फक्त 1-2 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. NTPC दादरी-2 आणि उंचाहर पॉवर स्टेशनमध्ये फक्त 1-2 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.” दरम्यान, गुरुवारी दिल्लीत पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक विजेची मागणी ६,००० मेगावॅटवर पोहोचली, हा एक विक्रम आहे. डिस्कॉम्सचा अंदाज आहे की या उन्हाळ्यात सर्वाधिक वीज मागणी 8200MW च्या आतापर्यंतच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते.
“दादरी-II आणि उंचाहर पॉवर स्टेशनमधून वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याने, दिल्ली मेट्रो आणि दिल्ली सरकारी रुग्णालयांसह अत्यावश्यक संस्थांना 24 तास वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो,” असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. जैन यांनी म्हटले आहे कि , सध्या दिल्लीतील 25-30 टक्के विजेची मागणी या वीज केंद्रांद्वारे पूर्ण केली जात आहे आणि त्यांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. ते म्हणाले की सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि राजधानीच्या काही भागात लोकांना वीजपुरवठा खंडित होऊ नये याची खात्री करण्यासाठी शक्य ते सर्वकाही करत आहे.
वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवण्याच्या उपायांव्यतिरिक्त, केंद्र सरकारने राज्यांना ‘इन्व्हेंटरी’ तयार करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी त्यांची आयात वाढवण्यास सांगितले आहे. ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनने सांगितले की, देशभरातील औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे देशात वीज संकटाची शक्यता वाढत आहे.