AurangabadLatestUpdate : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला सशर्त परवानगी

औरंगाबाद : अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील १ मे रोजी होणाऱ्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. अर्थात ही परवानगी देत असताना राज ठाकरे यांना १५ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करून १ मे या महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांना आता आपले विचार व्यक्त करता येणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या परवानगीनुसार सायंकाळी साडे चार ते पावणे दहा पर्यंत ही सभा चालणार असून सभेला १५००० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असणार आहे.
महानायक आँनलाईनने दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळणार असे वृत्त दिले होते आणि या सभेला परवानगी का दिली जाईल ? याची कारणेही दिली होती.
दरम्यान आता महाविकास आघाडी सहित शिवसेना आणि भाजपनेही आपल्या जाहीर सभा घोषित केल्या आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था सभाच सभा चोहीकडे अशी होणार आहे. भाजपने तर आपल्या सभेला बुस्टर डोस सभा असे नाव दिले आहे