AurangabadCrimeUpdate : ३८ लाखांची फसवणूक, दोन वर्षांनी गुन्हा दाखल

औरंगाबाद : घर खरेदी व्यवहारात कन्नड च्या शेतकर्याला २०२० साली ३८ लाखांना फसवल्याचा गुन्हा हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. प्रल्हाद शंकर सोनवणे(५०) रा.आलापूर टापरवाडी ता.कन्नड असे फसवणूक झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. सोनवणे यांनी जानेवारी २०१८ मधे हर्सूल परिसरातील राधास्वामी काॅलनीत ३८लाखांमधे घर खरेदी केले. या व्यवहारामधे सारंग वाघुले, विमल बदर, सोनाली माळकर व गणेश माळकर असे चार आरोपी आहेत. २०२०साला पर्यंत सोनवणे यांनी वरील आरोपींना आरटीजीएस, धनादेशा द्वारे ३८ लाख रु.अदा केल्याची अधिकृत नोंद आहे.पण तरीही आरोपींनी घर फिर्यादी सोनवणे यांच्या नावे केले नसल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.या प्रकरणी पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चव्हाण पुढील तपास करंत आहेत