GaneshNaikNewsUpdate : गणेश नाईकांविरुद्ध माझी लढाई कायदेशीर , पीडितेने दिलेली माहिती पाहा …

नवी मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मधून झालेल्या अपत्याला स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अडचणीत आलेले भाजप आमदार गणेश नाईक यांच्या महिला आयोगाने आदेश दिलेले असताना त्यांना अद्याप अटक होत नसल्याने राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणारी पीडित महिला न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलाने दिली आहे.
अमेरिकेत न्यूजर्सी येथे झाले बाळंतपण …
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पीडित महिला आणि आ. गणेश नाईक यांची भेट कुठे झाली असता, या महिलेने सांगितले कि , एका क्लबवर ती रिसेप्शनिस्ट होती तेंव्हा त्या दोघांची ओळख झाली आणि पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि शेवटी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झाले. मग मी त्यांच्याकडे आई बनण्याची इच्छा व्यक्त केली तेंव्हा त्यांनी संमती दिली आणि मी गरोदर राहिले. माझे बाळंतपण त्यांनी अमेरिकेत न्यू जर्सी येथे केले. बाळंतपणाच्यावेळी मी एकटीच तिकडे होते नंतर काही दिवसांनी नाईक साहेबांनी माझी आणि बाळाची भेट घेऊन चौकशी केली. दरम्यान मुलगा पाच वर्षाचा होईपर्यंत काहीही वाच्यता करू नको अशी समजही त्यांनी मला दिली होती. पुढे आज मुलगा १५ वर्षाचा झाल्यांनतर मी त्यांना याची आठवण करून दिली असताना त्यांनी असे काहीही करण्यास नकार दिला इतकेच नाही तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली त्यांच्या मुलानेही आपल्याला धमक्या दिल्या परंतु मी आपल्या आणि मुलाच्या हक्कासाठी लढत आहे असे सांगितले.
गणेश नाईक हे त्यावेळी मंत्री होते…
याबाबत अधिक माहिती देताना पीडित महिलेच्या वकिलांनी सांगितले की, गणेश नाईक यांची नवी मुंबई पोलिसांकडून कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे. आमच्यामार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले असून आमच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालाय. आता पुढे जाऊन आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. गणेश नाईक हे त्यावेळी मंत्री होते आणि महिलेवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे इच्छा नसताना ‘त्या’ नात्यात पीडित महिलेला भाग घ्यावा लागला. मात्र, आता पोलिस काय कारवाई करतात याकडे आमची नजर आहे. आमचा लढा न्याय मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रियाही वकिलांनी दिली.
दरम्यान त्या पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी आपल्याला राजकिय पाठिंबा भेटत आहे. या पाठिंब्याबद्दल वकिलांनी समाधान व्यक्त केले असून आता गणेश नाईक यांच्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल केले आहेत. परंतु, त्या महिलेच्या मुलाला देखभाल खर्च, संपत्ती, व्यवसाय देण्यात यावा अशी मागणी कोर्टात करणार असल्याचेही वकिलांनी सांगितले. तर, पीडित महिलेने आम्हाला न्याय भेटणार नसेल तर आम्ही कोर्टात जाणार याबद्दल आमदार गणेश नाईक यांना आधीच कल्पना दिली होती. गणेश नाईक यांच्या अटकेबाबत पोलिसांनी त्यांची कारवाई करावी. मात्र, मी माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया दिली.