Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत जेंव्हा मिरवणूक ‘या’ मशिदीजवळ आली तेंव्हा तरुणांनी काय केले ? तुम्हीच पहा…

Spread the love

पाटणा : देशातील जातीय आणि धार्मिक हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या शहरात घडू नये म्हणून अनेक तरुण काळजी घेताना दिसतात बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून व्हायरल होत असून या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, सध्या हा सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे बंधुभाव निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत हे उल्लेखनीय आहे.

https://twitter.com/manishndtv/status/1514988004628393998

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो आणि व्हिडिओ बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ जिल्ह्यातील फकर्ताकिया चौकातील जामा मशिदीचा असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा आहे, ज्यामध्ये काही ‘भगव्या परिधान’ तरुणांनी प्रेम आणि कौतुक दाखवत मशिदीसमोर मानवी साखळी तयार केली होती. यासोबतच तेथून भगवी यात्रा शांततेत काढण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारीही घटनास्थळी तैनात दिसले.

हे चित्र दिलासा देणारे असून अनेक लोक या फोटोवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.  कमेंट्ससोबतच लोक हा फोटोही बिनदिक्कतपणे शेअर करत आहेत. हा फोटो शेअर करत एका यूजरने लिहिले की, ‘हा आपला हिंदुस्थान आहे, जिथे सर्व धर्मांबद्दल प्रेम आणि आदर आहे.’ कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले, ‘खरंच खूप सुंदर फोटो. अशा बांधवांचा आम्हाला अभिमान आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!