SharadPawarNewsUpdate : Live : खा. संजय राऊत यांच्या कारवाईबद्दल बोललो , मोदींच्या भेटीनंतर पवार घेताहेत पत्रकार परिषद

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्षशरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. हि भेट नेमको कशासाठी होती ? याविषयी स्वतः शरद पवार खुलासा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीतल्या आपल्या ‘६ जनपथ’ या त्यांच्या निवासस्थानी त्यांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे.
पत्रकार परिषदेच्या प्रारंभी शरद पवार म्हणाले कि , लक्षद्वीपच्या प्रश्नांबाबत मोदींची भेट घेतली. लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले कि , लक्षद्वीपमधील नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांचे निर्णय चुकीचे आहेत. या ठिकाणी ७५ हजार लोक बेरोजगार आहेत. या मुद्द्यांवर मोदींशी बैठक झाली.
प्रश्न : तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात काय कारण होते ?
शरद पवार : पत्रकार आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.
प्रश्न : राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर पण कारवाई झाली आहे . त्याबद्दल काही बोलणे झाले ?
शरद पवार : नाही . त्याबद्दल काहीही बोललो नाही.
प्रश्न : युपीएच्या अध्यक्षपदाबद्दल काय ?
शरद पवार : मी आधीच सांगितले आहे कि , मला त्यात रस नाही . मागण्या होत असतात.
प्रश्न : मोदींशी आणखी काय चर्चा झाली ?
शरद पवार : सांगितले ना ….संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक, मोदींसमोर मुद्दा मांडला. विधान परिषद सदस्य नियुक्तीबाबत चर्चा झाली. राज्यपालांनी १२ आमदारांचा मुद्दा निकाली काढला नाही, हे मुद्देही मोदींच्या कानावर टाकले. यावर ते विचार करुन निर्णय घेतील, अशी अपेक्षा.
प्रश्न : राज ठाकरे या विषयी …?
शरद पवार : देशात जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केली जात आहेत हे योग्य नाही.
प्रश्न : महाविकास आघाडी …?
शरद पवार : महाविकास आघाडी आपला पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल. भाजपसोबत आपले कोणतेही संबंध नाहीत. महाविकास आघाडी चांगले काम करीत आहे. ५ वर्ष पूर्ण करुन महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार