MaharashtraPoliticalUpdate : ‘यांना’ सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय लढाई थांबणार नाही, पक्ष स्थापना दिनी फडणवीस यांचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई : ‘येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणार आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू. यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो’ असं म्हणत फडणवीस यांनी नव्या संघर्षाचे संकेत दिले आहे. भाजप पक्ष स्थापना दिननिमित्ताने मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आपल्या भाषणात फडणवीस पुढे म्हणाले कि , ‘पंतप्रधान मोदी जेव्हाही बोलतात तेव्हा आपल्याला ते दिशा दाखवतात. भाजपाची निर्मिती ही राष्ट्रवादातून झाली आहे. काश्मिरच्या मुद्यावरून मुखर्जी यांनी नेहरू मंत्री मंडळातून राजीनामा दिला होता. भाजपा हा विश्वातील मोठा पक्ष म्हणून नाव समोर आलं आहे. भाजपा पक्ष संपवण्याकरीता खूप प्रयत्न करण्यात आले. अनेक नेत्यांना आणीबाणी काळात २-२ वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आले. अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा २ होतो तेव्हा आम्ही घाबरलो नाही आणि आणि ३०० आहेत तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही’ असंही फडणवीस म्हणाले.
मनसेची पाठराखण
‘दोन संदेश मोदींनी आता दिले आहेत. एक समतेचा आणि दुसरा म्हणजे योजना प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचली पाहिजे’ असंही फडणवीस म्हणाले. ‘माझा शिवसेनेला सवाल आहे कि तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कितवी टीम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून’ असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे भाजपची सी टीम असल्याची टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देत मनसेची पाठराखण केली.
आयएनएस विक्रांत किंवा असे अनेक आरोप किरीट सोमय्यांवर करण्यात आले होते. मात्र कोणत्याही आरोपाबाबत पुरावे देण्यात आले नाही. पोलिसांवर देखील खूप दबाव देण्यात आला मात्र पोलीस बोलेले अशी कारवाई करता येत नाही, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला.
दरम्यान, भाजपाचा स्थापना दिवस कार्यक्रम मुंबईत १२०० ठिकाणी सुरू आहे. या देशासमोर खतरा निर्माण झालाय आणि तो खतरा घराणेशाहीचा निर्माण झाल्याच मोदींनी सांगितलं. मुंबईतील प्रत्येकाला घर हे फक्त घोषणेपुरते दिले नाही तर जे बोले ते दिले. घराणेशाहीने विश्वासघाताने डोकंवर काढलं आहे. मुंबई पालिकेत घराणेशाहीचा पराभव होणार आहे. ही काळ्या पाटीवरील पांढरी रेख आहे’ असे भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.