Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जय श्रीराम !! महागाईने केले जगणे , मरणे आणि आता आजारी पडणेही झाले कमालीचे महाग …

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशातील नागरिकांचे जगणे , मरणे आणि आता साधे आजारी पडणेही महाग झाले होणार आहे करणं आता अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढणार  थेट १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. या औषधांमध्ये पॅरासिटामॉल सारख्या अत्यावश्यक औषधाचाही समावेश आहे. दरम्यान डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीतही आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये इंधन, घरगुती वापराचा गॅस, खाद्य तेल , डाळी, साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे.

दरम्यान महागाईचा भडका उडाल्याने नागरिक आधीच त्रस्त झाले असताना आता औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ८०० पेक्षा अधिक औषधांच्या किमतीत थेट १० टक्क्यांनी वाढ होत आहे. यात पॅरासिटामॉलसह ताप, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, त्वचा विकार आणि अ‍ॅनिमियावरच्या उपचारांकरता वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.

Advertisements

सरकारच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या साथीनंतर औषधी उद्योजकांकडून  सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शेड्यूल औषधांच्या किमतीत १०.७ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेड्यूल ड्रगमध्ये अत्यावश्यक औषधांचा समावेश होतो आणि त्यांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. या औषधांच्या किमती मंजुरीशिवाय वाढवता येत नाहीत. यामध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

येत्या १ एप्रिलपासून वाढ होणाऱ्या औषधांमध्ये फिनाइटोन सोडियम, मेट्रोनिडाझॉल, पॅरासिटामॉल यांसारख्या आवश्यक पेनकिलर अर्थात वेदनाशामक आणि अ‍ॅंटिबायोटिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. नॅशनल फार्मा प्रायसिंग ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे औषधांच्या दरात वाढ होत आहे. एकीकडे औषधांच्या किमतीत वाढ होणार असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढताना दिसत आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच वैतागले आहेत. दरम्यान डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीतही आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!