Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DabholkarMurderNewsUpdate : नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना साक्षीदारांनी ओळखले

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना  ओळखले आहे. दाभोळकरांच्या खुनाचा आरोप असलेले अंदुरे आणि कळस्कर या दोघांनी दाभोळकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचे  या साक्षीदाराने सांगितले  आहे. आता पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. तसेच विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड.ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले आहे. बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले

Advertisements

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून त्यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी त्या पुलावर साफ सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आले आणि कावळ्यांचा आवाज देखील आला. दरम्यान साक्षीदार तिकडे पाहत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!