MumbaiNewsUpdate : रजनीश शेठ राज्याचे महासंचालक तर संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त

मुंबई : आयपीएस हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर आता संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे.
Sanjay Pandey has been appointed as new Mumbai Commissioner of Police; outgoing Mumbai CP Hemant Nagrale transferred: Maharashtra Govt pic.twitter.com/fg3Qp4NsUq
— ANI (@ANI) February 28, 2022
स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाईमुळे पांडे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, परंतु तो स्वीकारला नाही. त्यांनी राजानीमा परत घेतला, मात्र त्यावेळेपासून पांडे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला होता.
दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचं नाव पोलीस महासंचालक पदासाठी सर्वात आघाडीवर होते तर मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे आणि विवेक फणसाळकर यांच्या नावाची चर्चा होती. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार रजनीश सेठ आणि आर व्यंकटेशन यांची नावे पोलीस महासंचालकपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होती . अखेर रजनीश सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.