तिसऱ्या आघाडीचा एनडीएला कोणताही धोका नाही – रामदास आठवले

तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत भेटले असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. सध्या यांची भेट महत्वाची मानली जात आहे कारण, राव यांनी भाजपाच्या विरोधात आघाडी सुरु असून, बिगरभाजपा आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच तिसऱ्या आघाडीच्या तयारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले. कि, “शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन केली असली तरी एनडीएला कोणताही धोका नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लोक आनंदी आहेत,” तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका भाजपा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्र आणि तेलंगणा या बिगरभाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे. बदल ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केली व जुलमाच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य राव यांनी या वेळी केले असून, देशात बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. थोडा वेळ लागेल, पण सारे संघटित होतील आणि चित्र बदलेल. ही लढाई लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आहे, असे चंद्रशेखर राव म्हणाले.