काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

Congress Former Union minister Ashwani Kumar resigned from the Congress party Tuesday.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. येत्या 20 फेब्रुवारील पंजाबमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्या मतदानाच्या पुर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
अश्विनी कुमार यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. पंजाबमध्ये तिकीट वाटपावरून काँग्रेस पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रसचे खासदार राहुल गांधी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केल्याने, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिंधू देखील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. अशातच पंजब काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.