Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshElectionUpdate : मुस्लिम भगिनी मोदींचे गुणगान करू लागल्यावर ‘त्यांच्या’ पोटात दुखू लागले : नरेंद्र मोदी

Spread the love

सहारनपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे  आज आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित केले. या रॅलीत बोलताना मोदी म्हणाले कि , यूपीसाठी भाजपचे सरकारच आवश्यक आहे. या राज्यात परिवारवादी सरकार आले तर कोरोनाची लस रस्त्यावर विकली जाईल. आता लोकांनी ठरवले आहे की यूपीचा विकास कोण करणार, यूपीला दंगलमुक्त कोण ठेवणार, कोण आमच्या माता-मुलींना भयमुक्त ठेवणार आणि कोण गुन्हेगारांना तुरुंगात ठेवणार, लोक त्यांनाच मतदान करतील.


ते पुढे म्हणाले, “तिहेरी तलाकच्या जुलमातून आम्ही मुस्लिम भगिनींची सुटका केली. तिहेरी तलाक कायदा करून मुस्लिम भगिनींना सुरक्षेची हमी दिली होती, मात्र मुस्लिम भगिनी मोदींचे गुणगान करू लागल्यावर मतांच्या काही ठेकेदारांची अस्वस्थता वाढली. त्यांच्या पोटात दुखू लागले. मुस्लिम बहिणी आणि मुलींचे हक्क रोखण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. मुस्लिम महिलांवर कोणी अत्याचार करू शकत नाही, त्यामुळे यूपीमध्ये योगी सरकार आवश्यक आहे.

आपल्या या प्रचार सभेत पंतप्रधानांनी प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांची खरडपट्टी काढत  त्यांना ‘सकल कुटुंबवादी’ असे संबोधले. ते म्हणाले, “ते लोक सत्तेत असते तर आज रस्त्याच्या मधोमध लसी विकल्या गेल्या असत्या आणि तुम्हाला कोविडसोबत जीवन-मरणाचा खेळ खेळायला भाग पाडले गेले असते.” त्यांनी मुझफ्फरनगर आणि सहारनपूर येथील दंगलीचाही उल्लेख केला आणि समाजवादी पक्षाला ‘दंगलखोर’ म्हटले.

पीएम मोदी म्हणाले, “मी आजकाल पाहतोय की एकामागून एक ‘कुटुंब पक्ष’ खोटी आश्वासने देत आहेत. सत्ता त्यांच्या नशिबात लिहिली नाही कारण त्यांना माहित आहे की यूपीच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. जेव्हा कोणी अशी मोठी आश्वासने देतात त्यांच्या घोषणा पोकळ आहेत. कोरोनासारख्या महामारीमध्ये एकाही गरीबाला उपाशी झोपू दिले जात नव्हते. आज यूपीच्या लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत आहे.”

आम्हीही विकास करतो आणि आम्हाला आमच्या वारशाचा अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवतो आणि कर्तापूर कॉरिडॉर बनवतो. त्यामुळे विकासासाठी भाजप सरकार आवश्यक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!