भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लतादीदी यांचे निधन

Lata Mangeshkar Passes away
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणे जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले होते. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण या उपचादारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
It is with profound grief that we announce the sad demise of #LataMangeshkar at 8:12am. She has died because of multi-organ failure after more than 28 days of hospitalisation post #COVID19: Dr Pratit Samdani, who was treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/ndqdJWpqb1
— ANI (@ANI) February 6, 2022