AurangabadCrimeUpdate : ऑनलाईन हडपलेली रक्कम सायबर पोलिसांच्या तत्परतेने मिळाली परत…

औरंगाबाद- एनीडेस्क एप वापरून नागरिकांचे ५० हजार र. हड्पणाऱ्या भामट्याच्या खात्यातून सायबर पोलिसांनी रक्कम पार्ट काही मिनिटातच परत मिळवून दिली. या वेळी एपीआय अमोल सातोदकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, असा प्रसंग एखाद्या नागरिकांवर आलाच तर त्यांनी गोंधळून न जाता गुन्हा घडल्यानांतर शक्य तितक्या लवकर सायबर पोलिसांना संपर्क करावा.
या प्रकरणात फिर्यादीचे नाव विशाल पाटील(२७) रा. बजाजनगरअसे आहे. पाटील यांच्या कोटक महिंद्रा क्रेडिट कार्ड च्या खात्यातून दर महा ३०० रु. कट होत होते. त्याबाबत बँकेकडे चौकशी करण्या करता त्यांनी आज रविवारी ११. वा. गुगलवर कोटक बँकेचा नंबर सर्च केला त्यावेळी मिळालेल्या नंबरवर पाटील यांनी संपर्क केला असता त्या भामट्यानें पाटील यांना एनिडेस्क एप डाऊनलोड करायला लावले व थोड्याच वेळात पाटील यांना त्याच्या खात्यातून ५० हजार रु. डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी या घटनेनंतर घाबरून न जाता सरळ सायबर पोलीस ठाणे गाठले व रीतसर तक्रार दिली.
पोलीस कर्मचारी रवी पोळ यांनी संबंधित कंपनीशी तात्काळ मेलद्वारे संपर्क करत विशाल पाटील यां चे भामट्याच्या खात्यात ट्रान्सफर होणारी रक्कम पाटील पायांना काही वेळातच परत मिळवून दिली. वरील कारवाई पोलीसआयुक्त डॉ निखिल गुप्ता व पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर व पोलीस कर्मचारी रवी पोळ यांनी पार पाडली.