IndiaNewsUpdate : मै मौत से नही डरता … सुरक्षा घेण्यास ओवैसींचा नकार

नवी दिल्ली : मै मौत से नही डरता … अशा शब्दात उत्तर प्रदेशात त्यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारप्रकरणी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आज संसदेत वक्तव्य केले. हा द्वेष संपवा, ही तुमची जबाबदारी आहे. या तरुणांना कोणी भडकवले हा प्रश्न आहे.आम्ही द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊ. उत्तर प्रदेशातील जनताच गोळीचे उत्तर बॅलेटने देईल, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
लोकसभेत बोलताना ते म्हणाले कि , ‘मला झेड श्रेणीची सुरक्षा नको आहे, मी १९९५ पासून राजकारणात आहे. मी मृत्यूला घाबरत नाही . आपण सगळेच एक ना एक दिवस मारणार आहोत. गरिबांचे प्राण वाचवणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. देशाच्या पंतप्रधानांशी संबंधित प्रकरणामध्ये सुरक्षा भंगाचे प्रकरण समोर आले तेव्हा मी ते चुकीचे असल्याचे म्हटले होते. हे द्वेष आणि द्वेषाचे राजकारण संपले पाहिजे.
विशेष म्हणजे, गुरुवारच्या घटनेनंतर केंद्र सरकारने असदुद्दीन ओवेसी यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कमांडोद्वारे झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ओवेसी यांच्या सुरक्षेसाठी २४ तास सीआरपीएफ कमांडो कार्यरत राहणार आहेत. एआयएमआयएमच्या प्रमुखांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय हापूरमध्ये त्यांच्या गाडीवर गोळीबाराच्या घटनेनंतर घेण्यात आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहून दिल्लीला परतत असताना ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. होता याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
एआयएमआयएम प्रमुखांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. चार राऊंड गोळीबार करण्यात आला. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली पण मी तिथून दुसऱ्या गाडीत बसलो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.