Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार

Spread the love

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या कारवर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. ओवेसी यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये प्रचार आटोपून ते दिल्लीला परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणी आयजी मेरठच्या म्हणण्यानुसार, पिलखुवा टोल प्लाझा येथे गोळीबार झाल्याची चर्चा आहे. आम्ही सीसीटीव्ही पाहत आहोत. मात्र, गोळी झाडली नसल्याचे टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या एवढी माहिती मिळाली आहे की ओवेसींचा ताफा जात होता, त्यादरम्यान काही लोकांमध्ये वाद झाला होता. कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही. सीसीटीव्ही तपासणीनंतरच कोणत्याही प्रकारची पुष्टी केली जाईल.

दरम्यान कितापूर, मेरठ येथून प्रचार आटोपून आज ते दिल्लीला परतत असताना छाजरसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या वाहनावर ३-४ लोकांनी गोळीबार केला आणि ते लोक शस्त्रे सोडून पळून गेले, असा दावा ओवेसी यांनी केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये ओवेसी यांनी लिहिले की, ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. चार राऊंड गोळीबार करण्यात आला. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली पण मी तिथून दुसऱ्या गाडीत बसलो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. ओवेसींनी ट्विट केलेल्या व्हिज्युअल्समध्ये त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला दोन बुलेट होल दिसत आहेत. तिसरी गोळी गाडीच्या टायरला लागली. खासदार ओवेसी दुसऱ्या गाडीतून निघाले. ओवेसी यांनी मेरठमध्ये एका सभेला संबोधित केले.यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!