RepublicDaySpecial : अमिताभ बच्चन यांनी दिल्या अशा शुभेच्छा ज्याची होते आहे चर्चा…

नवी दिल्ली : देशात आज सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना अनेक जण आपापल्या कल्पनेनुसार प्रतिक्रिया देत असताना बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वेगळ्याच ढंगात आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
प्रजासत्ताकदिनी अमिताभ बच्चन यांनीही यावेळी स्वत:चा एक फोटो शेअर करून इन्स्टा चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या छायाचित्रात अमिताभ बच्चन यांची दाढी तिरंग्याच्या तीन रंगात दिसत आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मानेही यावर भाष्य केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा.’ त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोला अनेकांनी लाईक केले असून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. यावर एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्ही दाढीला झेंडा बनवला आहे. या फोटोवर कॉमेडियन कपिल शर्मानेही कमेंट केली आहे. अमिताभच्या या फोटोवर कपिल शर्माने हसणाऱ्या इमोजीसह हाहाहा असे लिहिले आहे.
या खास प्रसंगी अमिताभ बच्चन यांनी आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो घराचे आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन व्यासपीठावर उभे आहेत आणि हस्तांदोलन करून अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रध्वजाचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘रनवे 34’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे ‘झुंड’, ‘गुड बाय’, ‘बटरफ्लाय’ असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.