वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यास खंडपीठाची स्थगिती

औरंगाबाद – परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयावर चौकशीसाठी प्रशासक नेमण्यास न्या. एस. वी गंगापूरवाला व न्या. एस.डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
परळीच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालय या संस्थेच्या अधिकृत कार्यकारणी आणि व्यवस्थापनामध्ये वादविवाद असल्याचे कारण दाखवून महाविद्यालयावर प्रशासक नियुक्तकारण्याच्या संदर्भात सक्रिय सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित असलेल्या पॅनल मधून निवडून आलेल्या सदस्यांकडून चौकशी करण्याचे आदेश १५ संप्टेंबर २१ रोजी निर्देश दिले होते. यामध्ये महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालक पुणे, सहसंचालक उच्च शिक्षण पुणे, उच्चशिक्षण सहसंचालक औरंगाबाद या संस्थानी बामू विद्यापीठाला त्रिसदस्यीय समिती नेमून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. पण वैद्यनाथ महाविद्यालय संस्थेच्या वतीने एड. सतीश तळेकर यांनी खंडपीठाच्या हे लक्षात आणून दिले की, विद्यापीठाने नेमलेली ही समिती निपक्षपाती चौकशी करू शकत नाही न्या. गंगापूरवाला व न्या. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने एड. तळेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. तसेच चौकशी समिती नेमण्यासाठी महाविद्यालयाच्या विरोधात बामू विद्यापीठाकडे गंभीर तक्रारी असायला पाहिजे. तसाही प्रकार खंडपीठाला आढळून आला नाही. सत्तेतील राजकारणी लोकांनी अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. याप्रकरणी महाविद्यालयाच्या वतीने एड. सतीश तळेकर यांनी काम पाहिले.