CoronaMaharashtraUpdate : राज्यात पुन्हा ४० हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात पुन्हा एकदा ४० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात ४१ हजार ३२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात ४०,३६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या ६८,००,९०० इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३% एवढे झाले आहे.
दरम्यान आज राज्यात ८ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या १,७३८ झाली आहे. त्यापैकी ९३२ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. मुंबईतील आजची रुग्णसंख्या मागील काही दिवसांच्या तुलनेत दिलासादायक आहे. मुंबईत मागील २४ तासांत ७,८९५ नवे करोनाबाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच २१,०२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.