BeedAccidentUpdate : बीड जिल्ह्यातील स्विफ्ट कारला अपघात , दोन ठार एक जखमी

बीड : भोकर येथून परळीमार्गे बीडकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाला आहे. ही कार तेलगाव येथे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट बाभळीच्या झाडाला धडकून हा भीषण अपघात झाला. आज संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता कि, अपघातग्रस्तांना जेसीबीच्या साहाय्याने कारमधून बाहेर काढावे लागले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरुण स्विफ्ट डिझायर गाडीने भोकर येथून बीडला जात होते. युनूस शेख, सचिन मोकमपल्ले अशी मृतांची नावे आहेत. तर अमोल वाघमारे असे जखमी तरुणाचे नाव आहे.