CoronaIndiaUpdate : सर्वोच्च न्यायालयात ४ न्यायाधिशांसह १५ कर्मचारी विळख्यात

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सुरु असलेला कोरोनाचा संसर्ग आता संसदेच्या पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला आहे. अधिकृत वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधिशांसह तब्बल १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टातील कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासाठी उद्यापासून न्यायालयात हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने दिली आहे.
सुप्रीम कोर्टातील एकूण ३२ न्यायाधीशांपैकी ४ न्यायाधीशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जवळपास ३००० कर्मचाऱ्यांपैकी १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने २जानेवारीला कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता ३ जानेवारी पासून दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजीटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता.
या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आवारात कोरोना टेस्टची सुविधा करण्यात आली असून ही टेस्टिंगची सुविधी सोमवार ते शनिवार सुरु असते. याबाबत एक परिपत्रकही काढण्यात आले आहे. “कोरोना वाढता प्रसार आणि अचानक वाढलेली रुग्णसंख्या पाहता सु्प्रीम कोर्टात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास कोरोनाची तातडीने टेस्ट करुन घ्यावी”, असे त्या परिपत्रकात म्हटले होते त्यानुसार या होत असलेल्या चाचण्यांतून हि रुग्णसंख्या आढळून आली आहे.