CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधिताचा वाढता आलेख

मुंबई : गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ४४,३८८ नवीन रुग्णाचे निदान झाले असून एकाच दिवसात २०७ नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आहे. तर १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.०४ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहे तर २६१४ व्यक्ती सस्ंथात्मक क्वारटाईनमध्ये आहे.
विशेष म्हणजे आज सांगलीमध्ये सर्वाधिक ५७ रुग्ण आढळले आहे. तर मुंबईमध्ये ४० रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ पुणे २२, नागपूर २१, पिंपरी चिंचवड १५, ठाणे १२, कोल्हापूर ८ अमरावती ६, उस्मानाबाद ६ बुलडाणा आणि अकोल्यात प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहे. नंदूरबार, सातारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहे. तर औंरगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत सर्वाधिक ६०६ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले आहे. तर पुण्यात रुग्ण संख्या २२३ वर आहे. तर ४५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान मुंबईत आज दिवसभरात साडे १९ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १५ हजार ९६९ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर १ हजार २४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल २० हजार ३१८ नवे रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने आज काहीसे कमी रुग्ण आढळले आहेत. मुंबईत दिवसभरात आज १९ हजार ४७४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईत आज ८ हजार ६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.