Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोदींच्या घोषणेवर राहुल गांधी , उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिक्रिया

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरणाबाबत केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले.


मोदींच्या या घोषणेवर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हटले आहे की ”केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे आणि हे एक योग्य पाऊल आहे. लस आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.” यासोबतच त्यांनी २२ डिसेंबरचे एक ट्विटही शेअर केले, ज्यात ते बूस्टर डोसवरून सरकारवर निशाणा साधला होता.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदींच्या घोषणेचे स्वागत करताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधीच तशी मागणी केली होती याची आठवण करून दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लसीचे बूस्टर डोस देण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि ते सर्व लोकांना देण्यात यावे, असे सांगितले. या घोषणेबद्दल बोलताना केजरीवाल यांनी म्हटले आहे कि , आता १५-१८ वयोगटातील मुलांनाही कोविड-19 प्रतिबंधात्मक लस दिली जाईल हे जाणून मला आनंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला, केजरीवाल यांनी केंद्राकडे ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत्या अशा व्यक्तींना कोविड -19 लसीच्या बूस्टर डोसची परवानगी देण्याची विनंती केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!