IndiaNewsUpdate : देशात पुन्हा नवे कृषी कायदे , रेशीमबागेत केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा

नागपूर : केंद्राने केलेले नवीन कायदे मागे घेतले असले तरी लावणारच नव्याने विचार करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे कृषिमंत्री केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे मात्र हि माहिती त्यांनी संसदेत नव्हे तर नागपूरच्या रेशीम बागेत आयोजित कार्यक्रमात दिली आहे. ‘सत्तर वर्षांनंतर कृषी कायद्याच्या माध्यमातून मोठी क्रांती घडविण्याचा विचार केंद्र सरकारने केला होता. काही कारणांमुळे सरकारला दोन पाऊल मागे यावे लागले. अशी खंत व्यक्त करून त्यांनी हि माहिती दिली. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा झाला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून कृषीमंत्री तोमर बोलत होते.
यावेळी बोलताना तोमर म्हणाले कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर आहे. त्याच श्रुंखलेत कृषी कायदे मांडण्यात आले. दुर्भाग्यवश कायदे लागू झालेले नाहीत. परंतु, त्यामुळे सरकार निराश झालेले नाही. पुन्हा एकदा नव्याने या दिशेन पाऊल उचलण्यात येईल. शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या सक्षमीकरणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील. इतर क्षेत्रांप्रमाणेच कृषीमध्येही खासगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. खासगी गुंतवणूक वाढल्यास शेतकऱ्यांची प्रगती शक्य आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत एकूण २८ लाख हेक्टर क्षेत्रात पाम तेल तयार होणाऱ्या पिकाची लागवड केली जात आहे. यातील नऊ लाख हेक्टर क्षेत्र हे एकट्या ईशान्येकडील राज्यात आहे.’
दरम्यान पंतप्रधानांनी पिकांच्या आधारभूत किमतीसाठी (एमएसपी) समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये सर्व पिकांना एमएसपीमध्ये आणण्याचा विचार होऊ शकतो. कृषी क्षेत्रातील असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. धर्म आणि कृषी या दोन घटकांना आमची प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन तोमर यांनी केले.