IndiaNewsUpdate : मोठी बातमी : अखेर दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन समाप्तीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे परत घेतल्या नंतर अखेर गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन परत घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर चालू असलेले आंदोलन ११ डिसेंबर रोजी संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान या विषयावरील केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील. यानंतर १३ डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांचे नेते श्री दरबार साहिब, अमृतसरला भेट देतील. यासोबतच पंजाबमधील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या पदयात्राही १५ डिसेंबरपासून संपणार आहे. दरम्यान, १५ जानेवारीला पुन्हा शेतकरी नेत्यांची आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांनी दिली.
We have decided to suspend our agitation. We will hold a review meeting on Jan 15. If Govt doesn't fulfill its promises, we could resume our agitation: Farmer leader Gurnam Singh Charuni following a meeting of Samyukta Kisan Morcha in Delhi pic.twitter.com/lWKMdtjeRI
— ANI (@ANI) December 9, 2021
गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार तिन्ही कृषी कायदे माघारी घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नव्हते . दरम्यान कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर जवळपास २० दिवसांनी हे आंदोलन समाप्त काण्यात येत असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमांवर आंदोलनकर्त्यांनी उभारेलेले तंबू सोडण्यास सुरुवात केली असच्याचे चित्र आहे.