MaharashtrarainUpdate : महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस

मुंबई : देशातील पावसाळा संपून थंडीला सुरुवात झाली असली तरी दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा भागात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान २९ नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे, २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. २८ आणि २९ नोव्हेंबरला केरळ आणि माहेमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Heavy rain is very likely to occur over #TamilNadu coast during the next 48 hours, causing water-logging at many places and a flood like situation at one or two places. #TamilNaduRainshttps://t.co/cg4dNzBxNl
— Skymet (@SkymetWeather) November 27, 2021