MaharashtraNewsUpdate : शेतकरी कायदे : मोदींच्या टीकाकारांना जनताच उत्तर देईन : देवेंद्र फडणवीस

नाशिक : केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली असतानाच, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठेपणाचे कौतुक केले आहे. ‘निर्णय मागे घेण्याचा मनाचा मोठेपणा पंतप्रधानांनी दाखवलाय. अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले कि , कृषी कायदे मागे घेतल्यामुळं मोदी सरकारवर टीका होत आहे . टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात. देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. पण काही लोक सतत विरोध करत होते. हा निर्णय शेतकऱ्यांना पटवून देण्यात यश आले नाही, असे पंतप्रधानांनीच म्हटलंय,’ जे टीका करतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. त्यांची भूमिका दुटप्पी आहे. त्यामुळे त्यांना जनताच उत्तर देईल.