CoronaMaharashtraUpdate : राज्यात १ हजार ०९४ नवीन रुग्ण, १ हजार ९७६ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात १ हजार ९७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजपर्यंत एकूण ६४ लाख ६३ हजार ९३२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४% एवढे झाले आहे.
आज राज्यात १ हजार ०९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आज रोजी राज्यात एकूण १२ हजार ४१० सक्रिय रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३५,२२,५४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२०,४२३ (१०.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,२९,७१४ व्यक्ती गृह विलगीकरणात तर ८७० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दरम्यान महाराष्ट्राने कोरोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा गाठला आहे.
महानायक ऑनलाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी
https://chat.whatsapp.com/F3HZZ9cJVfWBOJ7oBc5r2L