…आणि एक महिन्यानंतर, चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकले

मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी जम्मू काश्मिरमधून ड्रग्स आणून मुंबईत विक्री करत होते. ही टोळी मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील ड्रग्स तस्करी करत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 6 आणि यूनिट 7 ने ही मोठी कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत 14 कोटी 44 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तस्करांनी ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचची टीम गेल्या एक महिन्यापासून दहिसर येथील चेक नाक्यांवर सापळा रचून तस्करांची वाट पाहात होते, एक महिन्यानंतर, चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.