शाहरुख खान भाजपमध्ये गेल्यावर, कोकेन नाही पीठीसाखर सापडले असे म्हणतील… : छगन भुजबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

३ ऑक्टोबरपासून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटकेत आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असून पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, “शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यावर तिथे कोकेन नाही तर पीठीसाखर सापडले असे म्हणतील.” राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी असा टोला गावला आहे.

Advertisements

सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यावर तिथे कोकेन नाही तर पीठीसाखर सापडले असे म्हणतील, तसेच, सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मुंद्रा बंदरावर तीस हजार ड्रग्ज सापडले त्याचे नावसुद्ध नाही. ते तर बंदर आहे. त्याची चौकशी नाही. पण शाहरुख खानच्या घरामध्ये घुसले. संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. रोज कोणाच्या तरी घरी धाडी पडतात. अजित दादांच्या बहिणींच्या घरी धाडी पडतात. हे सगळे पाहिल्यांनतर वाईट वाटते की काय चाललंय, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधाला विरोध करायचा म्हणून आंदोलने उभी करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकार समोर जागरण घाला, निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात भाजपाचे राहुल रमेश वाघ ,भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये जेंव्हा आलो तेंव्हा माझे जंगी स्वागत करण्यात आले या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही, असे हि छगन भुजबळ म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!