तर देश गुन्हे मुक्त होऊ शकतो… : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचे उद्धाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारला टोला लगावला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याचा आरोप तसेच मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांना टोला लगावला आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाल्याचे आपण सांगत आहोत. माझ्या आणि पुढील पिढ्यांना हे स्वातंत्र्य अनायसे मिळाले आहे. लढा द्यायचा होता तो मागील पिढीने दिला आहे. आम्ही काहीही केले नाही. त्याग या पिढीने केलेला आहे. आम्ही स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली म्हणून साजरी करत आहोत. पण हा स्वातंत्र्य महोत्सव आपल्याला चिरंतन टिकवायचा आहे, असे सांगतानाच विधी तज्ञ्जांनी देशाला मार्गदर्शन केले पाहिजे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. तसेच, तु पदावर आहेस म्हणजे तुझी मर्जी हा अधिकार होऊ शकत नाही. तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी हे कोणी तरी आम्हाला सांगितले पाहिजे. मी सामान्यांच्या मनातील बोलत आहे. लवकरात लवकर तज्ञ्जांकडून या प्रकारावर प्रकाश पडेल याची मला आशाच नाही तर विश्वास आहे. घटनेची चौकट काय असते? त्या चौकटीत काम केले तर मला वाटते समाज, देश गुन्हे मुक्त होऊ शकतो, असे देखील ते म्हणाले म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले,’1958 पासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहित नाही तरीही केस सुरूच आहे. कुठे पळून गेला माहित नाही. पण आरोप केलेत ना.. मग खणून काढ… खणलं जातंय.., चौकशी सुरु आहे’, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे परमबीर सिंग यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘या पद्धतीला आता आळा बसण्याची गरज आहे. अनेकदा कोर्टात जाऊन आयुष्य निघून जाते. त्याचा खर्च परवडत नाही, असंही म्हणाले आहेत. याशिवाय ‘मी तुम्हाला कोर्टासाठी इमारत देणार आहे आणि आपल्याच काळात ती इमारत पूर्ण करणार आहे, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी देशाचे सरन्यायाधीश ए.व्ही.रम्मना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, मंत्री भागवत कराड आणि अन्य न्यायमुर्ती आणि अधिकारी उपस्थित होते.