AurangabadCrimeUpdate : जिल्ह्यात घरफोड्या करणार्या टोळीतील दोघांना बेड्या,२८घरफोड्या उघडकीस

औरंगाबाद – जिल्ह्यामधील ग्रामीण भागात घरफोड्या करणार्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हेशाखेने ३लाख६३हजारांच्या मुद्देमालासह जेरबंद केले.अशी माहिती पोलिसअधिक्षक निमित् गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय मारोती शिंदे (३०) रामा अण्णा पवार दोघेही रा. भोकरदन अशी अटक आरोपींची नावेआहेत.दोघेही रेकाॅर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्यावर मालमत्तेसंदर्भातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खुलताबाद,पिशोर, कन्नड,फुलंब्री वडोदबाजार,सिल्लोड,चिकलठाणा,कन्नड, पैठण, गंगापूर,देवगाव,वैजापूर, शिऊर सोयगाव या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुध्द गुन्हेदाखल आहेत.वरील कारवाई पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,पीएसआय विजय जाधव, प्रदीप दुबे, पोलिस कर्मचारी नामदेव शिरसाठ, संजय देवरे,योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी पार पाडली