MaharashtraNewsUpdate : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी १ लाख ९० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीचे जिल्हा सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांना १ लाख ९० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी घेतलेल्या त्यांच्या घराच्या झाडाझडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. एकूण कागदपत्रांसह २ कोटी ८१ लाख ८९ हजार रूपयांची मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्याकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०), असे आरोपी अधिकाऱ्याच नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी वैध करण्याकरिता वानवडी भागात राहणारे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जिल्हा सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांनी तक्रारदाराकडे ८ लाख रूपयांची मागणी केली. त्यावर तडजोडी अंती २ लाख देण्याचे ठरले. त्यानुसार काल रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी वानवडी येथील नितीन चंद्रकांत ढगे यांच्या घराजवळ तक्रारदारा १ लाख ९० हजार रुपये देण्यास गेला.
या तक्रारीनुसार अगोदर परिसरात सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार हा आरोपी ढगे यांना पैसे देताच क्षणी रंगेहाथ पकडण्यात यश आले. त्यानंतर आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता. त्यावेळी १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. तर इतर मालमत्ता कागदपत्र असे मिळून २ कोटी ८१ लाख ८९ हजार रूपयांची मालमत्ता मिळून आली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. तसेच आरोपी अधिकारी ढगेकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.