IndiaNewsUpdate : केरळमध्ये पूरसदृश स्थिती , २१ जणांचा मृत्यू

तिरुवनंतपूरम : केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या राज्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला असून आतापर्यंत कोट्टायममध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळ राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
#KeralaRains | Death toll due to heavy rains & landslide in Kerala stands at 21 (Kottayam-13 and Idukki- 8): State's Information & Public Relations Department
(File pic from Koottikkal, Kottayam district earlier today) pic.twitter.com/NKt0J3ZkcC
— ANI (@ANI) October 17, 2021
दरम्यान नागरिकांना वाचविण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले असून याशिवाय नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहनं वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.
११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
तिरुवनंतपूरम, कोल्लम, पठानमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड यासह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Spoke to Kerala CM Shri @vijayanpinarayi and discussed the situation in the wake of heavy rains and landslides in Kerala. Authorities are working on the ground to assist the injured and affected. I pray for everyone’s safety and well-being.
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2021
पंतप्रधान मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केरळला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. ‘मुसळधार पाऊस आणि भूस्खलना घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि फटका बसलेल्या नागरकांना मदत करण्यासाठी काम सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो’, असं पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले आहे.