AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : पत्नीचा कुर्हाडीने खून करून पतीची आत्महत्या

औरंगाबाद : दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोटूळ रेल्वेस्टेशन परिसरात टाकळीवाडी शिवारात रविवारी पहाटे अडीच वा.सुमारास पत्नीचा कुर्हाडीने खून करुन पतीने विहीरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंगाबाई चंपालाल बिघोत (४८) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.तर चंपालाल तानासिंग बिघोत(५२) असेआत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. मयतांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलगा पोलीस दलात तर जावई एसआरपीएफमध्ये !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयतांच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी असून मोठा मुलगा अर्जून (३०) पोलिस दलात मुंबई येथे कार्यरत आहे. तर लहान मुलगा राहूल हा घरीच आई वडलांना शेतीत मदत करतो तर जावई प्रतापसिंग जारवाल हे जालना येथे एस.आर.पी.एफ मधे आहेत. दोन्ही मयतांचे सतत कडाक्याचे भांडण होत होते. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी अर्जून बिघोत यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. वृत्त हाती येई पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजश्री आडे तपास करंत आहेत.
पत्नीशी भांडण झाल्यामुळे, रिक्षाचालकाने घेतला गळफास
औरंगाबाद : वाळूज येथे राहणार्या रिक्षाचालकाने बायकोशी भांडण झाल्यावर सिडको औद्योगिक परिसरात येत रेल्वेपटरीजवळील मंदीरात गळफास घेतला.
या प्रकरणी एम.सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल गुलाब लहाणे(४०)रा.मंठा जालना हल्ली मुक्काम वाळूज असे मयताचे नाव पोलिस ठपासात उघंड झाले.अंदाजे ४दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळले.पण परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देणे टाळले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस करंत आहेत.
बीडबायपासवर जबरी चोरी, एक महिलेसह तिघांना बेड्या
औरंगाबाद : तंबाखू मागण्याच्या बहाण्याने रविवारी पहाटे १ वा. बीडबायपासवर बोलेरो जीप अडवून लूटमार करणार्या चौघांना सिडको औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सुमित गढवे , मारुती काळे, योगेश चांदणे, पूजा देशमुख अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील चौघांनी जीप अडवून ११ हजार १०० रु.हिसकावले.या गुन्ह्यात वापरलेली ४० हजारांची मोटरसायकल व हिसकवलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर सोनगिरे यांनी केली आहे